नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०७५
ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥
काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥धृपद॥
नाम अखंड हृदयी राहो वाणी । नको पडो विसर क्षण जागृती स्वप्नी । संत समागम ऐसा दे लाऊनि । आणीक दुजे काही नेणे तुज वाचुनी ॥२॥
पंथ पुरींचा रवी सुत पुरे आता । आड करावा भवसिंधू ऐसा नव्हता । नाही अडथळा त्रेकोल्या माजी सरता । विनवी तुकया बंधू चरणी ठेउनी माथा ॥३॥
अर्थ
हरी तू लवकर ये आणि मला तुझ्या कृपेचे दान दे. माझ्या जीवनातील अहंकाराचा अज्ञानाचा नाश कर आणि तुझे चरण मला दाखव. देवा माझी अार्त इच्छा माझ्या अंतकरणातील इच्छा तू पूर्ण कर. मी तुला शरण आलो आहे तू मला भेट दे आणि माझी उपेक्षा तू करू नको. हे देवा तू माझ्या देहामध्ये काम, क्रोध , आशा, तृष्णा , अहंकार , माया , लज्जा , चिंता काहीच राहू देऊ नको. सदासर्वकाळ पंढरी त राहीना असा जन्म दे बाकी अणिक दुसरे काही मागणे माझे तुझ्यापाशी नाही देवा. तुझे नांव माझ्या हृदयात, वाणीत अखंड राहू दे मला तुझा विसर जागृती व स्वप्नात देखील एक क्षणभरसुद्धा पडू देऊ नकोस. देवा मला असा संत समागम लाभू दे की तुझ्या वाचून मी दुसरे काहीच जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा रविपुत्रं जो यम त्याच्या गावी जाण्याचा रस्ता आहे तिकडे जाण्यास चालले नको त्या वाटेने जाणे नको व त्यामुळे या भवसिंधूला तू माझ्या पुढून नाहीसे कर देवा तुमच्या या कर्तव्याला त्रैलोक्या मध्ये कोणीही अडथळा करणार नाही त्यामुळे मीच तुमच्या चरणावर मस्तक ठेवून तुम्हाला हि विनंती करत आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
