नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०६८
संसारसंगे परमार्थ जोडे । ऐसे काय घडे जाणतेनो ॥१॥
हेंडग्याच्या आळा अवघी चिपाडे । काय तेथे गोडे निवडावी ॥धृपद॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊ पाहे ॥२॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटी विचार त्या ॥३॥
अर्थ
हे लोक हो अहो संसाराची संगती केली म्हणजे परमार्थ मध्ये लाभ होणे शक्य आहे काय ? जनावराने चघळुन टाकलेली चिपाटे त्यामध्ये चांगल्या प्रकारची वैरण असते काय आणि आपल्याला ती निवडता येईल काय? ढेकुन असलेल्या बाजेवर सुखाची झोप येईल काय आणि तशी कल्पना करून बोलणे देखील मूर्खपणाचे ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात मद्य सेवन केल्यानंतर मनुष्य आपल्या देखील ढुंगणाची लंगोटि सोडून देण्यास भीत नाही इतकी ती मद्य बुद्धी भ्रष्ट करते आणि कोणी जरी चांगले विचार त्या मनुष्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते चांगले विचार सांगणाऱ्या लोकांना दुष्ट समजतात.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
