नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०६१
हरीजनाची कोणा न घडावी निंदा । साहात गोविंदा नाही त्याचे ॥१॥
रूपा येऊनिया धरी अवतार । भक्ता अभयंकर खळा कष्ट ॥धृपद॥
दुर्वास हा छळो आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥
द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केले ॥३॥
न साहे चि बब्रु पांडवा पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥४॥
तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी । अश्वत्थामा वधी पाडवपुत्रा ॥५॥
अर्थ
हरीभक्तांची कोणीही निंदा करु नये कोणाकडूनही त्याची निंदा घडू नये आणि जर तसे झालेच तर ते गोविंदाला सहनच होत नाही. हा गोविंद भक्तांकरता अवतार धारण करतो आणि भक्तांना अभय देतो आणि दुष्टांना कष्ट देतो भय देतो. दुर्वास ऋषी अंबर ऋषींना छळण्याकरता आले पण हे भगवंताला सहन झाले नाही त्या हरीने आपले सुदर्शन त्यांच्या पाठीशी लावले व ते सुदर्शन त्यांना पीडा देत फिरु लागले. कौरवांनी भरसभेत द्रौपदीचा अपमान केला त्यामुळे या श्रीपती भगवानाला ते सहन झाले नाही ते रागावले व त्यांनी पांडवांना साहाय्य करुन या कौरवांची मदनशांती केली. ब्रभू हा पांडवाचा शत्रू होता ते हरीला सहन झाले नाही आणि आपल्या मोठया बंधूचे म्हणजे बलरामदादाचे दुर्योधनावर प्रेम होते असे असले तरी युध्दाच्या काळी हरीने बलरामदादाला योजना करुन तीर्थयात्रेस पाठवले व कौरवाचा नाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, “अश्वत्थाम्याने गुपचूप हल्ला करुन पांडवांच्या पाचही पुत्रांचा वध केला त्यामुळे या भगवंताने त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरील मणी काढून त्याच्या सर्व अंगाला दुर्गंध येईल असे केले. ”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
