१०३७, अभंग :- परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळू नये :- संत तुकाराम सार्थ गाथा
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०३७
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळू नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढता इंधनी वाढविला ॥धृपद॥
पितियाने तैसा वंदावा कुमर । जयाचे अंतर देवे वसे ॥२॥
तुका म्हणे शिरी वाहावे खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
अर्थ
जो परमार्थी आहे, ब्रम्हनिष्ठ आहे, हरीभक्त आहे त्याला आपण कोणतेही नाते जोडू नये त्याला आपला म्हणू नये त्याच्याशी लहान असला म्हणून त्याची अवहेलना करु नये कारण त्याचा अधिकार मोठा असतो. अग्नीची ठिणगी थोडी लहान जरी असले तरी लाकडाच्या संयोगाने ती मोठया अग्नीत रुपातर करते त्याचप्रमाणे हा परमार्थी मनुष्य लहान जरी असला ज्ञान आणि भक्तीच्या साहाय्याने तो मोठा अधिकारी असतो. ज्याच्या अंत:करणात नित्य देव वसलेला असतो अश्या पुत्राला बापानेही नमस्कार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “खापराच्या भांडयामध्ये नवनीत म्हणजे लोणी असेल तर त्या खापराला सुध्दा आपल्या डोक्यावर वाहावे लागते. जरी ते खापर मातीचे असले तरीही तसेच त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ब्रम्हनिष्ठ माणसाला परमार्थामध्ये किंमत असते त्यामुळे त्याचा देह, वय, कुळ, जात ही जरी हीन असली तरी तो सर्वांना पूज्य आहे. ”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
