१०२७, अभंग :- सांडोनीया दो अक्षरा । काय करू हा पसारा :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग – १०२७
सांडोनीया दो अक्षरा । काय करू हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणे दातारा नातुडेसी ॥१॥
म्हणोनि बोबड्या उत्तरी । वाचे जपे निरंतरी ।
नाम तुझे हरी । भवसागरी तारू ते ॥धृपद॥
सर्वमय ऐसे वेदांचे वचन । श्रुति गर्जती पुराणे ।
नाही आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥
शेवटी ब्रह्मार्पण । याचि मंत्राचे कारण ।
काना मात्रा वायाविण । तुका म्हणे बिंदली ॥३॥

अर्थ
हे दातारा तुझे हे दोन अक्षरी नांव म्हणजे “हरी” हे सोडुन बाकी पसारा मी कशासाठी घालू? मी जर विधिनिषेधाचा भार घेतला तर मी कर्मकांडामध्ये अडकेल व त्यामुळे मला तुझी प्राप्ती होणार नाही. म्हणूनहे हरी तुझे नाम मी माझ्या बोबड्या शब्दाने जपत आहे. कारण तुझे नामहरी आहे आणि तेच या भवसागरातून तारणारे आहे. तू सर्वत्र व्यापून उरलेला आहे हेच वेदाचे वचन आहे आणि उपनिषदे पुराने हेच गर्जून सांगतात. म्हणून हे हरी मी तुझ्या नामावाचून दुसरे कोणतेही नांव घेत नाही तुझ्या वाचून इतर कोणतेही साधनांची मला आवड नाही. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही वैदिक कर्म केल्यानंतर शेवटी ओम तत्सत ब्रम्हार्पनमस्तु हे वाक्य म्हणण्याची गरज आहे, कोणतेही वैदिक कर्म करताना मंत्र उपचार करताना त्याचा काना मात्रा वेलांटी चुकले तर ते वैदिक कर्म निष्फळ ठरते परंतु तुझे नाम घेतल्याने कोणतेही कर्म अगदी सहजच सफल होते असा तुझा नामाचा महिमा आहे.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading