नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०१३
सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथे अळंकार शोभती सकळ । भावबळे फळ इच्छेचे ते ॥धृपद॥
अंतरीचे बीज जाणे कळवळा । व्यापक सकळा ब्रम्हांडाचा ॥२॥
तुका म्हणे नाही चालत तांतडी । प्राप्त काळ घडी आल्याविण ॥३॥
अर्थ
कोणत्याही प्रकारचा सत्यसंकल्प आपण केले तर ते पूर्णत्वास जाण्यासाठी तो नारायण प्रयत्न करतो आणि ते सत्कर्म सत्यसंकल्प तो नारायण पूर्ण करतो आणि त्याचे फळही देतो. आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा मनोरथ तो नारायण पूर्ण करतो. आणि असाच सत्यसंकल्प करणारा भक्त त्याच्या अंगावर परमार्थातील सर्व अलंकार शोभतात आणि तो त्याच्या भक्तीच्या बळावर कोणतेही संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्यठेवतो. हा नारायण त्याच्या भक्तांच्या अंतःकरणातील सर्व इच्छा जाणत असतो कारण तो सर्वव्यापक आहे. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही सत्यसंकल्प पूर्ण करण्याकरता आपल्यावर हरी ची कृपा असावी लागते हरिकृपेचे वेळ आल्याशिवाय ते सत्य संकल्प पूर्ण होत नाही व त्याविषयी तातडी करणे हे योग्य नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
