१०१०, अभंग :- तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हा का हे डोळे कान दिले :- संत तुकाराम सार्थ गाथा
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०१०
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हा का हे डोळे कान दिले ॥१॥
नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥धृपद॥
आपुले पोटी तो राखियेला वाव । आम्हासी का भाव अल्प दिला ॥२॥
तुका म्हणे दुःखी असे हे कळो द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही निर्गुणाचे खोळे अंगावर पाघरून घेऊन बसला आहात मग आम्हालाच हे डोळे कान का दिले आहेत. हे देवा दुष्टांनी तुमची अपकीर्ती करावी निंदा करावी तुझ्या भक्तगणांचा अपमान करावा हे मला देखवत नाही आणि पाहवतही नाही. देवा तुमची निंदा किंवा अपकीर्ती कोणी केली तर तुम्ही ते सहन करतात एवढा वाव म्हणजे अवकाश तुम्ही तुमच्या पोटी ठेवला आहे पण आम्हाला ती सहन होत नाही असा संकुचित भाव आम्हाला का तुम्ही दिला? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी अपकीर्ती निंदा करणाऱ्या दुष्टांना तुम्ही सशान का करत नाहीत या कारणामुळे मी फार दुःखी झालो आहे. देवा या कारणामुळे यापुढे तुझे नामसंकीर्तन हे एक धंद्याने करावे असे मला वाटते अरे तुझे नाम करण्याकरता माझे मन उत्साही राहिले नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
