१३९, अभंग :- केला मातीचा पशुपति ।परि मातीसि काय महती ।:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.139

केला मातीचा पशुपति ।
परि मातीसि काय महती ।
शिवपूजा शिवासी पावे ।
माती मातीमाजी सामावे ॥१॥
तैसे पूजिती आम्हा संत ।
पूजा घेतो भगवंत ।
आम्ही किंकर संतांचे दास ।
संतपदवी नको आम्हास ॥धृपद॥
केला पाषाणाचा विष्णु ।
परी पाषाण नव्हे विष्णु ।
विष्णुपूजा विष्णुसि अर्पे ।
पाषाण राहे पाषाणरूपे ॥२॥
केली कांशाची जगदंबा ।
परि कांसे नव्हे अंबा ।
पूजा अंबेची अंबेला घेणे ।
कांसे राहे कांसेंपणे ॥३॥
ब्रम्हानंद पूर्णामाजी ।
तुका म्हणे केली काजी ।
ज्याची पूजा त्याणेंचि घेणे ।
आम्ही पाषाणरूप राहणे ॥४॥

अर्थ

मातीचे शिवलिंग करून त्याची पूज्या केली ती शंकराला पावते त्यामध्यो मातीचे काय महत्व कारण, शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते .त्याच क्षणि तीच महत्त्व संपते, तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात, ती संतहृदयातील पुजा भगवंतास पावते, आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संतपदविचा मोह आम्हाला नाही .दगडी विष्णुमूर्तिचि पूजा केलि असता पाषाण विष्णु होत नाही पुजा विष्णुला पावते, दगड दगडरुपच राहतो .काशाचि जगदंबेचि मूर्ति केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते, कासे हा धातु धातुच राहतो .तुकाराम महाराज म्हणतात, आशा प्रकारचे आपण ज्याची पुजा करु त्याची पुजा त्याला अर्पण होते संतांचा भक्तिभाव हा पुजेप्रमाने एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ति करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *