श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुळेवाडी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
अशोककाका कुलकर्णी
ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील

श्री दत्त योगीराज आश्रम वारकरी शिक्षण संस्था प्रवेश माहिती
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारा संचलित परम पूज्य गुरुवर्य कर्मवीर ह.भ.प.दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बालसंस्कार वारकरी व शालेय शिक्षण संस्था मुळेवाडी ता.कर्जत जि. अ.नगर या संस्थेचा 9 वा वर्धापन दिन सोहळा व सन 2021/ 22 नवीन वर्षातील वारकरी व शालेय शिक्षण प्रवेश प्रक्रिया दिनांक 24/6/2021 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे.
आपल्या पाल्यांचा प्रवेश अर्ज भरून देऊन प्रवेश निश्चित करावा ही विनंती.

“संस्थेची ठळक वैशिष्ट्ये”
१) अत्यल्प फीमध्ये दर्जेदार शिक्षण. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्स, मागील वर्षीचे गुणपत्रक, शक्य असल्यास शाळा सोडल्याचा दाखला, मोबाईल नंबर इ. जोडावे.
२) कोरोनाग्रस्त व इतर कारणाने निराधार परिवारातील अनाथ तसेच एक पालकत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.अनाथ किंवा एक पालकत्वाचा पुरावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्र जोडणे आवश्यक.
३ ) सर्व जाती धर्मातील, गोर-गरीब, ऊस तोड मजूर, वीटभट्टी व बिगारी कामगार,असहाय्य परिवारातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्राधान्याने प्रवेश.
४ )मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था
५ )वारकरी शिक्षणासाठी स्वतंत्र अनुभवी गुरुजन वर्ग.
६ )शालेय शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षक तसेच इयत्ता दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी विशेष तासिका.
७ ) निवासा सह उत्तम भोजन व्यवस्था.एक वेळेस नाष्टा दोन वेळेस भोजन दिले जाते.
८ दैनंदिन वापरातील वस्तू ,अंथरूण-पांघरूण ,कपडे, लोखंडी पेटी , मृदंग किंवा हार्मोनियम (आवडीनुसार) व शाळेचे साहित्य बरोबर असणे आवश्यक.
९ )निसर्गरम्य वातावरणात सुसज्ज इमारत, लाईट, पाणी, सुमारे अठावीस एकर परिसरात सर्व सोई युक्त असणारी एकमेव वारकरी व शालेय शिक्षण संस्था. खेळ, गायन-वादन सराव व अभ्यासासाठी भव्य पटांगण.
१० )अनाथ मुला मुलींना विनामूल्य शिक्षण दिले जाईल.
११) वारकरी शिक्षणाची ज्ञानगंगा भाग-१,२,३ ही स्वतंत्र पुस्तकमाला अध्यात्मिक शिक्षणासाठी संस्थेने तयार केली आहे.
१२ )संस्थेमध्ये… हरिपाठ ,काकडा, गाथा भजन, ज्ञानेश्वरी , गीता , प्रवचन, किर्तन, गायन, रामायण ,भागवत कथा ,मृदंग व तबला वादन,पावल्या,योगासने,प्राणायाम तसेच वारकरी संप्रदायाचे सदाचाराचे नियम शिकवले जातील.तरी आपल्या पाल्यांच्या सर्वांगिण कल्याणासाठी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा…
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
आपले विनीत…
रामायणाचार्य ह.भ.प.रविंद्रनाथ महाराज सुद्रिक पाटील
अध्यक्ष…. श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुळेवाडी ता.कर्जत जि.अ.नगर
📞 संपर्क मो.नं. 📞
९७६३०९९७६३
९१३२३२९३९३

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading