ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 99

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९९

अढळ सप्रेम उपरति पावो । हरि हरि घेवो तारक नाम ॥ संवगडे वागणें हरिपंथी चालों । हरि हरि बोलों दिननिशी ॥ पाहाते निमते सरे हंसगती । हरीची पंगती जेऊं बैसो ॥ ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा । संसार पिपासा दूरी करी ॥

अर्थ:-

जीवाचे सर्वात जास्त प्रेम संसारात असते त्या पासुन जीव परावृत्त होवो व तारक असणारे हरिनाम घेवो.हरिनाम घेणारे संवगडी बरोबर असतील तर तो सुध्दा हरिनाम दिवसरात्र घेईल. हंसचाली प्रमाणे हरिनाम घेतले तर त्या हरिच्या पंगतीचा लाभ होतो. संसाराच्या इच्छेचा शेवट रामकृष्णनामाच्या आशेने होतो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading