ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 839

image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१२ वे, स्वरूपस्थिती अभंग ८३९

नाहीं जातिकूळ तुझें म्यां पुशिलें । परी मन मावळलें देखोनियां ॥१॥ तुझेंची कुवाडे सांगेन तुजपुढे । तेणें मुक्तीची कवाडे उघडती ॥२॥ दुजापाशी सांगतां वाटे लाजिरवाणें । हांसतील पिसुणे प्रपंचाची ॥३॥ आतां उगवितांची भलें नुगवितां सांपडलें । ज्ञानदेव बोले निवृत्तीशीं ॥४॥

अर्थ:-

सगुण साकार परमेश्वरांचे दर्शन झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा, तुझी जात कुळ वगैरे मी काही विचारले नाही. तुला पाहून माझे मन विरघळून गेले. आतां तुझ्यापुढे तुझ्याच गोष्टी सांगेन व या कीर्तनरूप भक्तीने आमच्याकरिता मोक्षांची द्वारे सहज उघडली जातील इतर अनधिकारी माणसापुढे ही स्थिति सांगण्याची लाज वाटते. बरे त्यांना या स्थितीचे वर्णन करू गेले तर त्यांना त्याचे कांहीच महत्त्व वाटणार नाही. उलट ते ऐकून हासावयास लागतील कारण ते प्रपंच विषयकच वेडी झालेली असतात. हे निवृत्तीराया माझे पूर्वपाप फळाला न येता केवल पुण्य फलोन्मुख झाल्यामुळेच मला हे स्वरूप दिसले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply