ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.790

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७९०

संसार तुकलिये वेव्हारा मुकलिये । घराचारा पारूषलिये काय सांगों ॥१॥ माझें जिणेंचि बुडालें माझें जिणेंचि बुडालें । विठ्ठले कुडें केलें काय सांगों ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठलें । सहज मोलेविणे विकत घेतलें ॥३॥

अर्थ:-

संसारा तुकलिये,’ म्हणजे संसारांत माझी स्थिती कशी झाली आहे म्हणून काय सांगू मी सर्वस्वी व्यवहाराला मुकले आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीपुढे गृह व्यापारापासून मी अगदी निराळी झाली आहे. पारमार्थिक दृष्ट्या माझे व्यवहारिक जिणेच बुडाले आहे. असे या विठ्ठलाने माझे संसारांत वाटोळे केले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला माझ्या जीवीत्वाचे कांही एक मोल न देता मला आपलेसे करून टाकले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading