ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.754

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५४

मजमाजी पाहतां मीपण हरपलें । ठकलेंचि ठेले सये मन माझें ॥१॥ आंत विठ्ठलु बाहेर विठ्ठलु । मीचि विठ्ठलु मज भासतसे ॥२॥ मीपण माझें नुरेचि कांहीं दुजें । ऐसें नाहीं केलें निवृत्तिराजें म्हणे ज्ञानदेवो ॥३॥

अर्थ:-

मी आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असतां विचार करणाऱ्याचा मीपणाच नाहीसा होऊन जातो. त्यामुळे आंत बाहेर मीही सर्वत्र एक विठ्ठलच आहे असे ज्ञान होते. त्याठिकाणी त्या परमात्म्याहून मी वेगळा आहे ही द्वैत बुद्धी राहात नाही. अशी माझी स्थिति श्रीगुरूानवृत्तिरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply