ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.720

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७२०

आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥ हरि पाहिला रे हरि पहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥धु ॥ दृढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी ॥२॥ बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥३॥ कृपासिंधु करणाकरु । बापखुमादेविवरू ॥४॥

अर्थ:-
आजचा दिवस सोन्याचा आहे. आज अमृताचा पाऊस बरसला असे मला वाटते. कारण आज, मला हरिचा साक्षात्कार झाला आहे. तो अंतरबाह्य सर्वव्यापी आहे. त्याची मूर्ति विटेवर आहे. असा वनमाळी सुशोभित दिसतो. धन्य आहे तो संतसमागम कि ज्या संताच्या संगतीमुळे तो आत्माराम हृदयामध्ये प्रगट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते दयेचासमुद्रच असून भक्तावर कृपा करणारे आहेत. असे माऊली सांगतात.

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading