ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.714

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१४

अकार उकार मकार करती हा विचार । परी विठ्ठल अपरंपर न कळे रया ॥१॥ संताचे संगती प्रेमाच्या कल्लोळा । आनंदें गोपाळांमाजीं खेळे ॥२॥ भाळे भोळे भक्त गाताती साबडें । त्यांचे प्रेम आवडे विठोबासी ॥३॥ बापरखुमादेविवरू परब्रह्म पुतळा । तेथिल हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥

अर्थ:- ब्रह्मवाचकप्रणव हा अकार, उकार, मकारात्मक आहे. त्याचा योग्यांनी पुष्कळ विचार केला तरी अमर्याद ब्रह्मरूप जो विठ्ठल तो त्यांना कळत नाही. कारण’अमात्र’ परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही. म्हणून त्यांना कळणे शक्य नाही. तोच परमात्मा संताच्या संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या कल्लोळांत आनंदाने त्या गोपाळामध्ये खेळतो. माझे भाळे भोळे भक्त प्रेमाने भगवन्नाम साबडे प्रेमयुक्त साधे गातात. त्यांचे प्रेम विठोबारायाला फार आवडते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्माचा पुतळा असून त्याच्या ठिकाणच्या आनंदाचा सोहळा निवृत्तीरायच जाणे असे माऊली सांगतात.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-७ वे, संतमहिमा अभंग ७१४

अकार उकार मकार करती हा विचार । परी विठ्ठल अपरंपर न कळे रया ॥१॥ संताचे संगती प्रेमाच्या कल्लोळा । आनंदें गोपाळांमाजीं खेळे ॥२॥ भाळे भोळे भक्त गाताती साबडें । त्यांचे प्रेम आवडे विठोबासी ॥३॥ बापरखुमादेविवरू परब्रह्म पुतळा । तेथिल हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥

अर्थ:-

ब्रह्मवाचकप्रणव हा अकार, उकार, मकारात्मक आहे. त्याचा योग्यांनी पुष्कळ विचार केला तरी अमर्याद ब्रह्मरूप जो विठ्ठल तो त्यांना कळत नाही. कारण’अमात्र’ परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही. म्हणून त्यांना कळणे शक्य नाही. तोच परमात्मा संताच्या संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या कल्लोळांत आनंदाने त्या गोपाळामध्ये खेळतो. माझे भाळे भोळे भक्त प्रेमाने भगवन्नाम साबडे प्रेमयुक्त साधे गातात. त्यांचे प्रेम विठोबारायाला फार आवडते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ब्रह्माचा पुतळा असून त्याच्या ठिकाणच्या आनंदाचा सोहळा निवृत्तीरायच जाणे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading