ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.648

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४८

अवघेंचि मनें दोहीलिया धेनु । प्राणापानी प्राणु निवविला ॥१॥ तें रूप परब्रह्म जाणो प्राण सम । करूनियां नेम जपों आम्हीं ॥२॥ नेणों धूर्ति मूर्ति कैचिं हे प्रवृत्ति । कृष्णेचि समाप्ति सर्व करूं ॥३॥ निवृत्तीचें तारूं कृष्णी कृष्णसुख । ज्ञानदेवा चोख दिधलें नाम ॥४॥

अर्थ:-

आम्ही संसारिक वासना टाकून देऊन शुद्ध मनाने परमात्मरूप धेनूचे दोहन केले. आणि जीवाला धारण करणारे प्राणापानादिक हे सर्व परमात्मरूप करून जीवाला नित्य शांत केले. ते कृष्णरूप परब्रह्म यथार्थ जाणून व त्याच्याबरोबर प्राणापानाचे ऐक्य करून त्याचे नामजपाचा आम्ही निर्धार केला. हे आता त्या जपाशिवाय इतर सर्व साधनांची प्रवृत्ति श्रीकृष्ण परमात्मस्वरुपाचेच ठिकाणी समर्पण करू. श्रीगूरू निवृत्तिरायांनी परमात्मा श्रीकृष्णाचे ठिकाणी असणारे जें कृष्णरूप सुख तद्रूप नाम हेंच कोणी एक तारूं माझे हाती दिले आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading