ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.626

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२६

आत्मा अंगें प्रसिद्ध देखिला । अंतर्बाह्य अलिप्त व्यापला ॥१॥ देखिजेसें नाहीं देखिलें म्हणती काई । देखणें तेंही देखतुसे ॥२॥ रूपरेखा नाही लक्षावा कवणे ठायीं । लक्षी लक्षितांही परतल्या दृष्टि ॥३॥ ज्ञानदेव म्हणे आनंद होईल पूर्ण । अनुभवें तेचि खूण देखतसे ॥४॥

अर्थ:-

आत्म्याचे अपरोक्षज्ञान झाल्यावर तो सर्व दृश्य वस्तुच्या आंत बाहेर व्यापलेला असूनही अलिप्त आहे. हे अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही काय दिसले असे विचारल्यास त्या आत्मस्वरूप ज्ञानाचे वर्णन करता येत नसल्यामुळे काही नाही असेच म्हणण्याचे पाळी येते. पण आत्मानुभव मात्र असतोच. ज्याला रूप नाही, आकार नाही. अशी वस्तु पाहावी तरी कोठे? बरें जर दृष्टीने काही पाहण्याचा प्रयत्न करावा तर त्या दृष्टीने आत्मस्वरूपाचे आकलन न होता ती परतते. आत्मज्ञानाने ब्रह्मानंद प्राप्त होतो हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading