ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 597

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९७

विश्रांतीचे स्थान कोणरूप आम्हां । ऐसा हा महिमा सांगा स्वामी ॥१॥ चित्त नेई चित्ता चेत नेई तत्त्वा । कर्म परतत्त्वा हरवी रया ॥२॥ हे तत्त्व सांगे ज्ञानदेवा निवृत्ति । संसार पुढती नाहीं बापा ॥३॥

अर्थ:-

ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूनिवृत्तिरायांना विचारतात. हे श्रीगुरूनिवृत्तिराय आम्हांला विश्रांतीचे कोणत्या रूपाचे स्थान आहे. त्याचा महिमा काय आहे हे कपा करून सांगा. निवत्तिनाथ सांगतात की हे ज्ञानदेवा, चित्त नेहमी विषयाकडे जात असते. ते चित्त परमात्म्याकडे नेत जा त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कमें लय पावतात. मी सांगितलेल्या परमतत्त्वाच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला तर पन्ना संसारप्राप्ती होणार नाही. असे निवृत्तीनाथानी सांगितले हे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply