ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.341

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण १० वे, देवापाशी मागणे अभंग ३४१

माझिये हृदयीं बुंथी । ते डोळ्या सगुणप्रीति । वाचे नाम संपत्ति ऐसेचि असो । म्हणोनि तुझें नाम आवडे । हेंचि प्रेम न विसंबे वर्म निजध्यास रया ॥१॥ श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोडी । हीच आवडी देईं मना ॥२॥ तुझिये सगुण बुंथीचा वासु । व्हावा माझ्या हदयीं ऐसा । निज सुखाचिया निजध्यास । तुझिये आवडी अनुसंधान । तुझिया स्वरूपीं मन डोळां बैसो । कां ध्यान हेचि रूप हेंचि । निज आवडी देई कां दातारा । चुकवीं येरझारा गर्भवासु ॥३॥ म्हणौनि रखुमादेविवरा विठ्ठला । उदारा भावे जोडलासी आम्हां । श्रुतिपुराणें वर्णिती नेति नेति तुझा महिमा । तुझे नाम रूप सुंदर हेचि निरंतर । देई आम्हा सर्वोत्तमा रया ॥४॥

अर्थ:-
हे श्रीकृष्णा तुझी सगुण मूर्ति नित्य माझ्या अंतःकरणात असावी.त्याच सगुण मूर्तिविषयी डोळ्यांत प्रेम असावे. वाणीमध्ये नामोच्चाराची संपत्ती असावी अशी फार इच्छा असल्यामुळे मला तुझे नाम फार आवडते. याच नामाच्या प्रेमाने मनाला निदिध्यास लागून तुझा कधीही विसर होऊ नये कानांनी नेहमी तुझ्या नामाचे श्रवण करण्याची गोडी धरावी, अशी आवडी माझ्या मनामध्ये उत्पन्न कर. स्वकीय आत्मस्वरूपाच्या निजध्यासाने तुझ्या सगुण मूर्तिचा वास हृदयात नित्य असावा. तुझ्या आवडीचे अनुसंधान तुझ्या स्वरूपांच्या ठिकाणी मनात डोळ्यांत ह्याच रुपाचे सगुण मूर्तिचे दर्शन नित्य असावे, अशी आवडी मला होऊ दे. हे श्रीकृष्ण दातारा वारंवार गर्भवास घेऊन जन्ममरणाराच्या येरझारा कराव्या लागणाऱ्या त्यातून तू मला सोडव. अशी मला बुद्धि उत्पन्न झाली. म्हणून रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठला, ह्या भावांने आम्हाला तुझी जोड झाली. ज्याचे अंतःकरणांत तुझ्या विषयी भाव नाही. त्यास तुझी प्राप्ती किती कठीण आहे म्हणून सांगू? अठरा पुराणे सहा शास्त्रे साक्षात् श्रुतिसुद्धा नेति नेति म्हणून तुझा महिमा वर्णन करून गप्प बसतात. परंत भावबळाने तु आम्हाला प्राप्त झालास. एवढ्याकरिता हे सर्वोत्तमा नारायणा तुझ्या सुंदर नामरूपाचा लाभ आम्हाला सतत दे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading