ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.287
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८७
निर्मिला म्हणसी परेचा विस्तार । तेथे हा विचार वायांवीण ॥ परनाहीं तेथे अरूते कैचे । आदिमध्य साचें कळिका हरि ॥ नाहीं तें सन्मान विकृति उपरमु । त्या दीप दीप समु शेजेबाजे ॥ बापरखुमादेविवरू परेसी परता । हा विचारू अरूता दिसे भान ॥
अर्थ:-
शास्त्रवचनाचा आधार घेऊन परमात्म्यापासून हा त्रैलोक्याचा विस्तार झाला आहे असे म्हणतोस परंतु हा विचार अयोग्य आहे.त्या परमात्मवस्तुचे ठिकाणी अलीकडे, पलीकडे, आदि, मध्य, अन्त वगैरे कांही नसून सत्यत्वाने ज्ञानस्वरूप हरिच आहे. त्याला मोठेपणा नाही, विकार नाही, अर्थात उपरमही नाही. रखुमाईचे पती व माझे पिता हे स्वयंप्रकाशी आहेत. तसाच तो सर्वत्र समान आहे. त्यांच्या ठिकाणी ते परेहुनही पर आहते. असे म्हणणे देखील निकृष्ट आहे. असे माऊली सांगतात.
