ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.284

👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २८४
येथे तेथे दरि तो नांदे मंदिरी । आत्मा चराचरी एकपणे ॥ ऐसा पाहे दृष्टी । चैतन्याची सृष्टीं । तरी सुदर्शन घरटी आपेंआप ॥ जात जातपणे प्रपंच शोधणे । गाळुनिया गगन हंस घेई ॥ ज्ञानदेव संधी साधुनिया सिध्दी । छपनाची संधी टाकुनि गेला ॥
अर्थ:-
तो परमात्मा आत्मस्वरुपाने आजुबाजुस व घरदारात सर्वत्र एकपणाने व्यापुन आहे. ज्याच्याकडे आशी समदृष्टी आहे अशा जीवाच्या रक्षणासाठी त्याचे सुदर्शन चक्र त्यावर आपोआप घिरट्या घालत राहते.जसे निरक्षिररुपाने तो राजहंस सर्व घेत असतो तसाच हा प्रपंच पारखुन घे.मी ही सर्व पाहुन घेतले व शास्त्राच्या कटकटी टाकुन त्या स्वरुपाचा बोध घेतला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
