ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.272

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २७२

आवो कमळनयनीं चांदणे भासिले । तयामाजी एक निराकार देखिलें ॥ हेंहीं नव्हे तेही नव्हे । कांही नव्हे तोचि पैं होय । बापरखुमादेविवरू नव्हताचि पैं जाला । होऊनियां फाव फावो सरला गे माये ॥

अर्थ:-

डोळ्यामध्ये सुंदर सगुण परमात्मरूपी चांदणे दिसले. त्यामध्ये निराकार अशी वस्तु पाहिली म्हणजे त्याचे ज्ञान झाले. ती निराकार असल्यामुळे अशी नाही व तशी नाही असे काहीच बोलता येत नाही. सर्व अविद्या कार्याचा लय जेथे होतो. तीच ही निराकार परमात्म वस्तु होय. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मूळचे निर्गुण असून, सगुण झाले. म्हणून भक्तांना त्याला प्राप्त करून घेणे सोपे झाले असे माऊली सांगतात.

Leave a Reply