ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.246

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४६ 

वहिलिया येई रे । सौरभ्य घेऊनि जाई रे । तिया इया जिवित्वाच्या लाह्या रे भ्रमरा ॥ सुमनाचे जीवन विरुळे विपायें । वियोग जालिया केहीं न साहे रे भ्रमरा ॥ सकळिक पाल्हाळ रे । बापरखुमादेविवरू सुखाचें निधान रे भ्रमरा ॥

अर्थ:-

हे जीवरूप भ्रमरा तू आपल्या ठिकाणचा मीतुपणाचा भ्रम टाकून परमात्म्याच्या चरण कमलाचा आनंद घे.असे झाले म्हणजे तुझ्या जीवत्वाचा नाश होऊन जाईल. हे भ्रमरा तुझे जीवन क्षणाक्षणाला नष्ट होत आहे त्यामुळे श्रीकृष्णरूपी फुलाचा वियोग भोगावे लागेल. त्या श्रीकृष्णरूप फुलाच्या सुगंधाशिवाय इतर सर्व सुख नसुन दुःखच आहे म्हणून हे जीवरुप भ्रमरा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हेच कोणी फुल असून त्याच्या सुखाचा तू अनुभव घे, असे माऊली सांगतात.

Leave a Reply