ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.235

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३५

वेदवाणी चांग स्मरता स्मरण । नित्य नारायण हृदयी वसे ॥ तेथील गव्हर जाणतो विरुळा । ब्रह्मी ब्रह्मकळा साधुमुखें ॥ जाप्य जप होम विधि विधान हरि । हृदयीं श्रीहरि न कळे मुढा ॥ ज्ञानदेव म्हणे श्रीहरि हृदयस्थ । ऐसी आहे भाष वेदशास्त्री ॥४॥

अर्थ:-

वेदानी नारायणाचे स्मरण करायवा सांगितले तर तो तसे करणाऱ्याच्या हृदयात कायमचा स्थापित होतो.असे जाणणारे विरळच आहेत की जे साधुमुखातुन ब्रह्माची ही ब्रह्मकळा ऐकावी लागते. जपजाप्य, होम, विधी, विधान केल्यांने तो हरि हृदयाला कळतो हे मुढाना कळत नाही. तसे केल्याने तो हरि हृदयस्थ होतो आशी भाषा वेद वापरतात असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply