ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.225

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२५

मी माझे म्हणत संसारी गुंतले । तंव परत्र परतेंची राहीले । हे ना म्हणउनी तया झोबिंन्नलेतंव सिद्ध सिद्ध सिध्द हातीचे गेले ॥ पुढीला चुकला मागिला मुकला । तैसी परी जाली माते । आपआपणातें गोंवी । तरी बुद्धिदोष ठेवी कवणाते रया ॥ आतां एक बुद्धी आठवली । गेले ते परतेना मागुतें । बापरखुमादेविवर विठ्ठलु घ्याईजे । तरी सकळीक होई आपैते ॥

अर्थ:-

मी माझे म्हणत जीव संसारात गुंततो, तर

परमात्म वस्तु दूरच राहिली. हे ना म्हणून म्हणजे देह आत्मा म्हणून त्या देहासी तादात्म्य केले तर नित्य, सिद्ध, सुखरुप परमात्मा हातचा गेला. म्हणून पुढच्या परमात्मवस्तुला चुकला व मागिलाला मुकला, म्हणजे देहाचा नाश झाल्यामुळे देहरुपी आत्म्यालाही मुकला, अशी माझी स्थिती झाली आहे. कारण आपल्याच

बुद्धीच्या वेडेपणामुळे आपणच आपले गुंतवून घेतले आहेत. त्याचा दोष दुसरे कोणाला द्यावा. आता मनांत असा विचार आला आहे तो असा की, झालेली गोष्ट होऊन गेली, ती आता परत येणार नाही. तेव्हा पुन्हा प्राप्त झालेल्या देहांत माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने त्याचे ध्यान करत राहावे. मग सर्व प्राप्त होईल असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading