ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.208
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०८
कर्पुर अग्नीसी स्वदेहा नाशी । चंदनी मासी न थरे देखा ॥ घ्राणाची कळिका भ्रमर रुंजीका । तेथील झुळुका जी करी ॥ मोतियाचा चारा राजहंसा सैरा । दुजिया पाखिरा कामा नये ॥ ज्ञानदेव म्हणे घेती ते शाहाणे । येर ते पाहुणे यमाचे रया ॥
अर्थ:-
कापूर सुगंधी असतो पण त्याचा अग्निसी संबंध पावला तर नाश होतो. अग्नीत पडलेल्या सुगंधी चंदना वर तर त् माशी बसत नाही. कमळच्या फुला भोवती भुंगे रुंजी घालतात.पण ते कमळ फुलाच्या नाही तर त्याच्या सुवासा मुळे येतात. मोत्यांच्या चाऱ्यांची गोडी एका राजहंसालाच कळते दुसर्याला ती चव कळणार नाही. स्वतःत असणारे ब्रह्मस्वरुप ओळखणारे शहाणे असतात जे तसे ओळखत नाहीत ते सहज यमाचे पाहुणे होतात असे माऊली सांगतात
