ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.204
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०४ २०४
सुख आपले आपण तो पाहें । रूप आपुले आपण ध्यार रे मना ॥ लक्ष निवृत्तिचरणीं धीरू राहें । भेदुभ्रम सांडी सावध होये ॥ बापरखुमादेविवरू एकचि पुरे । जाणतील या सर्व सुख मोहरें ॥
अर्थ:-
अरे मना आपले आत्मसुख व आत्मरुप पाहा. ह्या मध्येच तुला सर्व सुख मिळेल.श्रीगुरू निवृत्तीच्या चरणाच्या ठिकाणी धीर धरून राहा. भेदभ्रम टाकून दे आणि सावध हो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचचे चिंतन कर त्यास जाणले असता तोच सर्व सुखाचे माहेर घर आहे असे माऊली सांगतात.
