ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.203
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २०३
ध्येय ध्याता हे दोन्ही नाही । तेथें ज्ञेय ज्ञाता उरे काई । अरे मना परापर परतें पाही । ते तू स्वंये आपण पाही रे मना ॥ रखुमादेविवरा विठ्ठलाची आण । जरी बुझसी तरी तूंचि निर्वाण ॥
अर्थ:-
श्री गुरुकृपेने ध्येय ध्याता हे नाहीसे झाले. त्याच बरोबर ज्ञेय ज्ञाता हेही उरले नाही. अरे मना पर श्रेष्ठ व कनिष्ठ जो जीवभाव याच्याही पलीकडे असणारे जे परमतत्व ते आपण स्वतःच आहोत असे मनाला सांग. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो. परमात्मस्वरूपांची ऐक्य समजले तरच मोक्ष मिळतो असे माऊली सांगतात.
