ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.191

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९१माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ं १९१

तोडें जाले संन्यासु । भोगावरी धावे हव्यासु ॥ ते नेणती ब्रह्मरसु । वाया होती क़ाविसु ॥ ब्रह्ममार्गाते साधु जाती । वायां चुकली तुझी भक्ति ॥ सर्वत्र आपणची म्हणती । अभक्ष्य भक्षण करिती ॥ तोंडी दंभ माया धंदा । शरण रिर्षे गोविंदा ॥ चुकले विठ्ठला उदारा । बापरखुमादेविवरा ॥

अर्थ:-

मी संन्यासी आहे असे तोंडाने लोकांना सांगता आणि मन भोगप्राप्तीच्या हव्यासामुळे भोगाकडे धावतो.अशा संन्याशांना यथार्थ ब्रह्मरस न कळल्यामुळे कासाविसी होते. ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाने धार्मिक लोक जातात खरे, पण त्या

प्राप्तीचे मुख्य साधन ते जे तुझी भक्ति त्या साधनाला ते चुकून सर्वत्र आत्मा व्याप्त आहे असे तोंडाने पोकळ गप्पा मारून अभक्ष भक्षण करतात. तोंडाने दंभाचा बाजार माजवून मायिक धंदा करण्यापेक्षा गोविंदाला शरण आ. रखुमादेवीवर माझा बाप उदार श्रीविठ्ठल त्याला चुकून असल्या धंद्यात पडू नका. असे माऊली सांगतात.

Leave a Reply