ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.182
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८२
सांगाती आमुचिया रे । विद् गद पावया छंदे रे ॥ नाचे विनोंदे कान्हा रे । विद्गद पावया छंदे रे ॥ निवृत्तिदासा प्रियो रे । विद्गद पावयां छंदे रे ॥
अर्थ:-
हा श्रीकृष्ण आमचा सोबती असून त्याच्या मुरलीच्या छंदाने आम्ही आनंदीत होतो.आमच्या भक्तिच्या प्रेमाने हा श्रीहरि आनंदाने नाचत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीदासाला प्रिय असणारा हा श्रीकृष्ण, पावा वाजवून त्याच्या नादांत बेहोष होऊन नाचतो. असे माऊली सांगतात.
