ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.165

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-६ वे, उपासना अभंग १६५

विठ्ठलयात्रे जाती वो माये । त्याचे धरीन मी पाये ॥ विठोबा माझी माहेर । भेटेन बुद्धि परिकर ॥ रखुमादेविवर विठ्ठलें । मन ठेउनी राहिलें निर्धारें ॥

अर्थ:-
श्री विठ्ठलाची यात्रा करणारे वारकरी त्यांचे पाय मी धरिन. विठोबा माझे माहेरच आहे.त्यामुळे त्या माझा माहेरच्या लोकांच्या दर्शनाला मी मनापासुन जाईन. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणी माझे मन बांधुन मी निवांत राहिन असे माऊली सांगतात.

Leave a Reply