ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 133
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३३
जे शंभूने धरिलें मानसीं । तेंचि उपदेशिलें गिरीजेसी ॥ नाम बरवें बरवें । निज मानसी धरावें ॥ गंगोदकाहुनीनिकें । गोडी अमृत जालें फिके ॥ शीतळ चंदनाहुनी वरतें । सुंदर सोनियाहुनि परतें ॥ भुक्तिमुक्तिदायक । भवबंधनमोचक ॥ बापरखुमादेविवरें । सुलभ नाम दिधलें सोपारें ॥
अर्थ:-
त्या चांगल्या नामाला शिवशंभुने मनात धरले त्याच नामाचा उपदेश त्यांनी गिरिजेस केला तेच नाम निजमानसात दृढ धरावे. ते नाम गंगोदकापेक्षा पवित्र व अमृतापेक्षा गोड आहे. तेच चंद्राहुन शितळ व सोन्यापेक्षा सुंदर व तेजस्वी आहे. ते नाम भक्ती व मुक्ती दायक अ़सुन ते भवबंधनापासुन सोडवते. माझे पिता व रखुमाईचे पती त्यांनी हा सुलभ व सोपा नाममंत्र दिला असे माऊली सांगतात.
