👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १०१
सुकुमार वेल्हाळ रूपे पैं सुंदर । तोचि पैं आगर नंदाघरी ॥ अवघ्या सुख देतु अवघ्या दिवटे । अवघेचि पेठे हरिनाम ॥ यापरी आगरू कृष्णनाम ठसा । ओतला सरिसा भाग्ययोगें । बाप निवृत्तिराज उपदेशिती आम्हा । ज्ञानदेवा महिमा नामें आला ॥
अर्थ:-
सुकुमार, वेल्हाळ असा सुंदर परमात्मा हाच त्या नंदाच्या घराचे आगर आहे. तो दिवटा बनुन सुखपथाचा हरिनामीमार्ग भक्तीच्या बाजारापर्यंत दाखवतो. हाच हरिनामाचा ठसा भाग्ययोगाने आमच्या वर ओतला गेला आहे. निवृत्तिनाथांनी पित्याप्रमाणे केलेल्या उपदेशामुळे तो नाम महिमी मला माहिती झाला असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 100
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 102
