ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 552

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५५२

योग तो कठिण साधितां साधेना । जेणे गा चिद्घना न पाविजे ॥१॥ याचीलागीं आतां सांगणे हें तुज । माझें निजगुज अंतरींचें ॥२॥ इंद्रिये कोंडावी आवरावें मन । सहज ब्रह्मज्ञान लाधलाशी ॥३॥ जेथे जेथें मन धांवोनियां जाय । तेथें गुरुचे पाय वसवावे ॥४॥ ज्ञानदेव म्हणे होईं तूं निर्गुण । कळेल तुज खूण पूर्ण तेव्हां ॥५॥

अर्थ:-

योगाभ्यास करणे फार कठीण आहे. तो साधता साधत नाही. जरी साध्य झाला तरी ज्ञानघन परमात्मा प्राप्त होईलच असे नाही. एवढ्याकरता तुला आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट सांगतो. ती ही की इंद्रिय निग्रह करावा, मनोनिग्रह करावा, व जेथे जेथे आपले मन जाईल. त्या त्या ठिकाणी सद्गुरुंचे पाय आहेत अशी भावना करावी. त्यामुळे ब्रह्मज्ञान तुला सहज प्राप्त होईल. तूं तुझ्या ठिकाणचे दुष्ट गुण टाकून देऊनं निर्गुण हो म्हणज तुला ब्रह्मस्वरुपाची यथार्थ खूण कळेल. म्हणजे तुला ब्रह्मज्ञान होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply