—————————————
*”गायीबद्दल 10 शुभ गोष्टी”*
—————————————-
अती शांत आणि सौम्य जनावर आहे गाय. हिंदू धर्मात ही पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे.
तसेच ज्योतिषाच्या अनेक शास्त्रांमध्ये गायीची विशेषता दर्शवण्यात आली आहे.
*गायीबद्दल दहा शुभ शकुन…*
★”ज्योतिषीमध्ये गोधूली मुर्हूत
विवाहासाठी सर्वोत्तम मानला आहे.
★प्रवास प्रारंभ करताना गाय समोर दिसली किंवा ती आपल्या बछड्याला दूध पाजताना दिसली तर प्रवास यशस्वी पार पडेल समजावे.
★घरात गाय असल्यास वास्तू दोष नाहीसे होतात.
★रोज सकाळी आपल्या आहारातून एक पोळी पांढर्या गायीला खायला दिसल्यास शुक्राचे नीचत्व किंवा शुक्र संबंधी कुदोष स्वत: समाप्त होतात.
★पितृदोष असल्यास गायीला दररोज किंवा अमावस्येला पोळी, गूळ आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
★आपल्या जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ स्थितीत किंवा केतूमुळे समस्या येत असल्यास गायीची पूजा करावी, दोष नाहीसे होतील.
★रस्त्यावर समोरहून गाय येताना दिसत असेल तर तिला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे, प्रवासात किंवा कामात यश मिळेल.
★वाईट स्वप्न दिसत असल्यास गायीच्या नावाने स्मरण करावे. मन शांत होईल, आणि अश्या स्वप्नांपासून मुक्ती मिळेल.
★गायीच्या तुपाचे एक नाव आयू असेही आहे-
*आयुर्वै घृतम्।*
अर्थात गायीच्या दूध-तूप याने व्यक्ती दीर्घयुष्य होतो.
★ हस्तरेषेत आयुरेखा तुटलेली असल्यास गायीचं तूप कामात घ्यावं आणि गायीची पूजा करावी.
★जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थिती असेल तर गायीच्या कुबडाचे दर्शन करावे.
गूळ आणि चण्याची डाळ ठेवून गायीला पोळी खाऊ घालावी.
★तसेच जन्मपत्रिकेत सूर्य-चंद्र कमजोर असल्यास गायीच्या डोळ्यांचे दर्शन करावे, लाभ प्राप्ती होईल.”
—————————————
—————————————
रामकृष्ण हरी माऊली
जयहरि महाराज जी