२८९७, अभंग :- देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८९७
देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे ॥१॥
ऐका नवलायाची ठेव । नेणताही भक्तिभाव ॥ध्रु.॥
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बसैला ॥२॥
पंखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाय देव ॥४॥
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हा कोवळा ॥५॥

अर्थ

देवाने कसे कसे महापराक्रम केले ते लक्षात घ्या त्याने महापापी लोकांचे देखील अनायासे सहजच उध्दार केला आहे. ज्यांच्या ठिकाणी भक्तिभाव आणि भक्तिभाव काय आहे हे देखील माहित नाही अशांचा देखील या देवाने उध्दार केला ही किती नवलाची गोष्ट आहे तेच तुम्हाला सांगायची आहे ते तुम्ही ऐका. अहो एक दिवस एक भिल्ल शिकारी व्याघ्राची शिकार करण्यासाठी बेलाच्या झाडावर बसला त्या दिवशी शिवरात्र होती आणि शिकार लवकर दिसेना म्हणून तो बेलाचे पान तोडायचा व खाली टाकायचा परंतू खाली शिवलिंग होते व अनायासे ते बेलपत्र शिवलिंगावर पडायचे कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसतांना केवळ अनायासे बेलपत्र शिवलिंगावर पडल्यावर देखील त्या भिल्लाचा उध्दार झाला व देवाने त्याला कैलासावर नेले. एक घार एक दिवस शिवलिंगावर बसली आणि सहजच तिने तिचे पंख फडकवले तर तो वारा भगवान शंकराला इतका सुखकारक वाटला की त्यामुळे भगवान शंकराने तिलाही उध्दरुन टाकले. एक दिवस एक चोर चोरी करुन पळत होता तर रात्री त्याला शिवलिंग दिसले नाही त्याने चुकून शिवलिंगावर पाय दिला तर भगवान शंकराला तो अभिषेकच वाटला व त्यामुळेच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या मदतीला धावले. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा स्वामी फारच भोळा आहे आणि भक्तांविषयी फारच संवेदनशील म्हणजे कोवळा आहे.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading