नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७११
नारायण ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥१॥
जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥
न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥२॥
कैवल्य तें जोडे । कृपा लवकरी घडे ॥३॥
जन्ममरणदुःख आटे । जाळें अवघेंचि तुटे ॥४॥
तुका म्हणे झाला । याचा गुण बहुतांला ॥५॥
अर्थ
नारायण नामरसासारखे उत्तम रस सेवन करावे हे कोणीही जाणत नाही. ज्या नारायणाच्या नामरसाने भवव्याधी तुटते आणि आपल्याला दु:ख भेटत नाही. या नामरसाने कोणत्याही प्रकारची विकाराची बाधा आपल्या पोटात राहू शकत नाही व हे प्राप्त करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची आटाआटी करावी लागत नाही. या औषधाने कैवल्याची प्राप्ती होते व देवाची कृपाही लवकर घडते. या औषधाने जन्ममरणाचे दु:ख आटूनच जाते आणि सर्व प्रकारचे जाळे तुटून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, या नारायण नामरस औषधाने खूप जणांना गुण आला आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
