नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७०१
आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥१॥
ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥
पळणें तों पळो सांडुनि कां बळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥२॥
तुका म्हणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥३॥
अर्थ
आपल्याला ज्या मार्गाने चालायचे आहे तो मार्ग स्वच्छ करावा म्हणजे मग कोणताही अडथळा येत नाही. असा शिष्टाचार परमार्थमार्गामध्ये पूर्वीपासून चालत आलेला आहे जसे वेदाने सांगितले आहेच त्याचप्रमाणे परमार्थमार्गाने आपण चालावे या परमार्थमार्गामध्ये पाप आणि पुण्याचा व्यवहार आपल्याला अडथळा आणतात. जर या परमार्थामध्ये धावायचे असेल तर देहबुध्दी टाकून धावावे नाहीतर उपाधीमुळे सुख दु:ख आपल्या पाठीमागे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, “जो परमार्थमार्गामध्ये विवेक आणि वैराग्य संपन्नशूर आहे तोच यातून सुटतो बाकी सर्व बापुडे लोक या कालचक्रात पडतात.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
