नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२६२४
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥
कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥
उदक भिन्न असे काई । वोहोळ बावी सरिता नई ॥२॥
सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥
वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥४॥
करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥५॥
वर्त्ते एकविध अग्नी । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥
तुका म्हणे पात्र चाड । किंवा विष अमृत गोड ॥७॥
अर्थ
सर्वांचे मांस आणि कातडे सगळेच सारखे आहेत ते भिन्न नाहीत मग यामध्ये हा शुध्द आहे किंवा अशुध्द आहे असा निवड तरी कसा करता येईल ? देवाजवळ कोणी एखादा गुणाने अधिक किंवा कमी असा भेद नाही. ओहळे विहिरी नदी हे जरी नावाने भिन्न आहेत तरी त्यामधील पाणी जो प्रकार आहे तो वेगळा आहे काय ? सूर्य आपल्या किरणांव्दारे पृथ्वीवरील विविध रसांचे सेवन करतो तरी देखील त्याच्या तेजाचा भेद किंवा निवड करता येईल काय ? गाया जरी विविध वर्णाच्या असल्या तरी त्यांच्या दुधाचा रंग एकच आहे. मडकी रांजण परळ इत्यादी वस्तू मातीपासून तयार होत असले तरी मातीत मात्र भेद नाही. अग्नी सर्वत्र सारखाच राहात असतो त्याच्या मनामध्ये हा शुध्द किंवा अशुध्द असे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपल्या हातामध्ये पात्र दिले तर आपण त्या पात्राची आवड धरु की त्याच्या आतमध्ये विष आहे की अमृत आहे याकडे लक्ष देऊ, तर आपण त्यामध्ये काय आहे त्याकडे लक्ष देऊ त्याप्रमाणे मनुष्य कोणताही असो कोणत्याही जातीतला असो आपण त्याचे चर्म किंवा मांस पाहू नये तर त्यातील एक देवच आपण पाहावा”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
