नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५६६
काय करूं सांगतांही न कळे वर्म । उपस्थित भ्रम उपजवितो ॥१॥
मन आधीं ज्याचें आलें होईल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥
अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥
तुका म्हणे आप राखावें आपणा । संकोचोचि कोणा नये आतां ॥३॥
अर्थ
लोकांना परमार्थाचे वर्म सांगितले तरी कळत नाही या उलट नको तो भ्रम त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतो त्याला मी काय करू. ज्याच्या मनाचा निग्रह होईल आणि त्याचे मन त्याच्या हातात म्हणजे त्याच्या ताब्यात येईल त्याच्यावरच मी केलेल्या उपदेशाची सत्ता चालेल. अभुकेल्या मनुष्या पुढे कितीही पक्वांन्न कितीही मिष्टांन्न ठेवले तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्याला स्वादही कळत नाही आणि चवही कळत नाही त्याप्रमाणे दुराग्रही माणसापुढे कितीही चांगला उपदेश केला ,कितीही वाद घातला तरी तो मिथ्या ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच आता कोणालाही उपदेश करू नये व संकोचही धरू नये आपल्या हिताचे जतन आपणच करावे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
