नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५०६
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥
आतां काशासाठी जोडी । हाड धांटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥
आइते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥
मानिली निंश्चिती । नरका जावया उभयतीं ॥३॥
झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥
तुका म्हणे बेटया । भांडवल न लगे खटया ॥५॥
अर्थ
आपला स्वतःचा मुलगा जर चोर झाला तर वाईट वृत्ती असणाऱ्या आई-वडिलांना आनंद होत असतो.ते स्वत:शीच विचार करतात आता कष्ट तरी कशासाठी करायचे हात पाय दुखून तरी का घ्यायचे. कारण चोर झालेला आपला मुलगा आयते सर्व काही आपल्याला घरी आणून देऊन आपले घर भरणार आहे. मुलगा असे वाईट कृत्य करतो त्याचे त्यांना समाधान तर होतेच परंतु ते दोघेही निश्चिंत होतात ,त्यांना नरकात जाणे हेच समाधान वाटते. अशा निर्लज्ज असणाऱ्या आईबापाच्याच पोटी अशी करंटी जन्माला येतात कारण जसे बीज असते तसेच फळ येते. तुकाराम महारज म्हणतात अशा खट्याळ चोरट्या मुलाला पैसा कमवण्यासाठी भांडवलच नको असते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
