२४५४, अभंग :- भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२४५४
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥
तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥
जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥
तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥

अर्थ

सर्व भूमी शुद्ध आहे परंतु मनुष्याची वासना ही अमंगळ असते हे जाणून घ्यावे. त्याप्रमाणे काही जीव असे आहेत की जे विनाकारणच भीतीने घाबरतात एखाद्या जागेचा गुण दोष नसूनदेखील त्या जागेत ते विनाकारण घाबरतात त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचा घाव होत नाही परंतु केवळ भीतीपोटी भूमीचा त्याग करतात.सर्व जीव परमार्थ दृष्टीने देव रूपच आहेत परंतु केवळ मी आणि माझे या खोट्या भ्रमाणेच मनुष्य नागवला जातो. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की भेद नाहीसा झाला की सर्व सृष्टी, भूमी जीव हे ब्रम्‍हस्वरूपच आहेत हे तुम्ही जाणताल.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading