नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३२७
करूनि राहो जरी आत्माचि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करू ॥१॥
जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥धृपद॥
पुरे पुरे आता तुमचे ब्रम्हज्ञान । आह्मासी चरण न सोडणे ॥२॥
विरोधे विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हाती गर्भवास ॥३॥
सांडीमांडीअंगी वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नावे ॥४॥
तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥५॥
अर्थ
देवा मी मनाला समजावीत आहे की आत्मा नित्य शुद्ध आहे तो सदा मुक्त आहे तो नीसंग आहे तरीदेखील मन निश्चल होत नाही त्याला मी काय करू? जेवल्या वाचून ढेकर कसा येईल त्याप्रमाणे आत्म्याचा कोणताही अनुभव नसताना आत्मा असा असतो तसा असतो असे म्हणणे म्हणजे शब्दांचेच प्रकार आहेत. देवा त्यामुळे आता तुमचे ब्रम्हज्ञान पुरे झाले खूप झाले आता तुमचे चरणच आम्हासाठी सर्व आहे ते आम्हाला सोडवत नाही. विरोधाने विरोध पुढे वाढतच जातो आणि जशी आपली अंतकाळी वासना असेल तसा आपल्याला जन्म प्राप्त होतो. विधी निषेधाच्या भानगडीत पडले की पाप-पुण्य आपल्या अंतकरणात वसत असते आणि “मी आणि माझे” असे समजणे म्हणजेच याला बंधन म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती मिळवणे ही गोष्ट काही सोपी नाहीये आणि देहअभिमानाचा निरास करणारा इथे कोण बलवंत आहे?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA