नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२८८
शरण आले त्यासी नेदावी हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥
अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावे परिसा हरी विज्ञापना ॥धृपद॥
गांजिलियाचे करावे धावणे । विनंती नारायणे परिसावी हे ॥२॥
भागलियाचा होई रे विसावा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥
अंकिताचा भार वागवावा माथा । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥
तुका म्हणे आम्हा विसरावे ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥
अर्थ
हे जगजेठी तुम्हाला शरण आलेल्या भक्तांकडे तुम्ही पाठ फिरऊ नका एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे हरी तुम्हाला जे भक्त आळवित असतील त्यांना तुम्ही पटकन उत्तर द्यावे एवढीच माझी विज्ञापना म्हणजे विनंती आहे. हे नारायणा जे गांजलेले आहेत दुःखाने त्रस्त झालेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही धावत जावे ही तुम्हाला विनंती आहे. हे केशवा दमलेल्या भागलेल्या लोकांचा तु विसावा हो एवढी माझी विनंती तुम्ही ऐका. हे अनंता तुला अंकित झालेल्या दासांचा योगाक्षेमाचा भार तु आपल्या माथ्यावर वागावा एवढी विनंती माझी ऐका. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा तु आम्हाला म्हणजेच तुला शरण आलेल्या, तुला आळवणाऱ्या, दुःखाने त्रस्त असणाऱ्या, दमलेल्या, भागलेल्या तुझ्या अंकित दासांना कधीही विसरू नये एवढी माझी विनंती ऐक
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
