नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२६७
माये मोकलिले कोठे जावे बाळे । आपुलिया बळे न वाचे ते ॥१॥
रुसोनिया पळे सांडुनिया ताट । मागे पाहे वाट यावे ऐसी ॥धृपद॥
भांडवल आम्हा आळी करावी हे । आपणे माये धावसील ॥२॥
तुका म्हणे आळी करुनिया निकी । देसील भातुकी बुझाऊनि ॥३॥
अर्थ
एखाद्या लहान मुलाला जर त्याच्या आईने मोकाट टाकले तर त्याने कोठे जावे कारण तो स्वतःच्या जीवावर जगू शकत नाही. लहान मुलं रुसले की ते काय करते तर वाढलेले ताटदेखील बाजूला सारते आणि रुसून एखाद्या कोपर्यात जाऊन बसते परंतु ते अशी वाट पाहते की आईने यावे आणि आपली समजूत काढून आपल्याला घेऊन जावे. त्याप्रमाणे हे देवा आम्ही तुझ्यापाशी हट्ट करावा एवढेच एक भांडवल आमच्या जवळ आहे आणि आम्ही रूसुन कोठे बसलो की तु आपण होऊनच आमच्या पाठी मागे धावत येतोस. तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही योग्य प्रकारचा हट्ट तुझ्याकडे करू मग तु आमची काहीतरी समजूत काढून आम्हाला खाऊ देशीलच.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
