२२०२, अभंग :- हागिल्याचे सिंके वोणवाचि राहे । अपशकुन पाहे वेडगळ:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. २२०२
हागिल्याचे सिंके वोणवाचि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥
अतेता समय नेणता अवकळा । येऊ नये बाळा सिक धरा ॥धृपद॥
भोजनसमयी ओकाचा आठव । ठकोनिया जीव कष्टी करी ॥२॥
तुका म्हणे किती सांगावे उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥३॥

अर्थ

एखादे लहान मुल हागल्या नंतर उनवेच राहते त्याचे तसे पाहून एखादा वेडगळ मनुष्य ही तसाच राहतो परंतु त्याचे तसे राहणे म्हणजे अपशकुनच असते. एखादी गोष्ट योग्य वेळेत न झाल्याने अवकळाच ओढुन घेतल्यासारखे होते आणि एखादी क्रिया अशी करू नका की जेणेकरून बळेच दुराग्रह तुमच्या अंगावर येईल याची शिकवण तुम्ही मनात धरा. जेवण जेवताना काही लोक आपण ओकलो होतो , ते कसे ओकलो होतो हे आठवण करून उगाच जीवाला कष्ट करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात अभाग्याला एखादी चांगली गोष्ट किती वेळा म्हणून समजून सांगावे परंतु त्यांना ते कळतच नाही कारण त्यांना त्यांचे दुर्गुणच अनावर झालेले असतात.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading