१७७९, अभंग :- स्वये पाक करी । संशय तोचि धरी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १७७९
स्वये पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरी । आणीक परी बुडती ॥१॥
जाणे विरळा एक । जाले तेथींचे हे सुख । देखिले बहुतेक । पुसता वाट चुकले ॥धृपद॥
तोचि जाणे सोंवळे । शोधी विकल्पाची मुळे । नाचती पाल्हाळे । जे विटाळे कोंडिले ॥२॥
तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी । वेठी आणिक धरियेले ॥३॥
अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वायाविण । ते झांकून बैसती ॥४॥
करणे जयासाठी । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साठी । चित्तवित्तेंवाचूनि ॥५॥

अर्थ

जो स्वतः स्वयंपाक करतो व तोच नंतर म्हणतो की या स्वयंपाकामध्ये काही विष वगैरे तर पडले नाही? त्याच्या या संशयाच्या सागरांमध्ये जी जेवणासाठी इतर लोक आलेले असतात ते ही बुडतात. हरीचे सुख कशात आहे हे जाणनारा एखादाच असतो. एरवी परमार्था मध्ये तुम्ही हरीचे ज्ञान अनुभवले आहेत काय असे विचारणारे व वाट चुकलेले खूप लोक पाहिले आहेत. सोवळे म्हणजे काय हे केवळ कोण जाणते तर जो आपल्या चित्ता मधून विकल्पाचे मूळ जी अविद्या आहे तिचा शोध करून नाश करतो त्यालाच सोवळे म्हणजे काय माहित असते. आणि जे केवळ वर वर सोवळ्याचे सोंग आणून नाचत असतात तेच खरे, विटाळाने कोंडून गेलेले असतात. जो बाल्य तारुण्य आणि वृद्ध अवस्थेमध्ये आपली बुद्धी जपतो तोच हरित ज्ञानाची संधी साधत असतो. आणि जे संदेहाच्या जाळ्यात अडकतात ते लोक कर्तुत्व आणि वक्तृत्वाचा जाळ्यात अडकतात. सर्वत्र समान बुद्धी ठेवणे व समाधानी राहणे हेच खरे अखंड ध्यान आहे. आणि जे लोक डोळे झाकून ध्यानाला बसण्याचे सोंग करतात त्यांचे असे वागणे व्यर्थं आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे हरी च्या प्राप्ती करता प्रयत्न करत आहेत त्यासाठी वेगळी आटाआटी करायची काहीच गरज नाही. त्या हरीला केवळ चित्त आणि वित्त जरी अर्पण केले तरी तो हरी प्राप्त होतो.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading