नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १७७६
अवघिया चाडा कुंठीत करूनि । लावी आपुलीच गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना ।
करूनिया देशधडी । मीतूपणापासाव गुंतलो मिथ्या । संकल्प तो माझा तोडी ।
तुझिये चरणी माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवी पिंडी रे रे ॥१॥
माझे साच काय केले मृगजळे । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुके खेळती कवतुके । काय त्यांचे साचपण ॥धृपद॥
वेगळाल्या भावे चित्त तडातोडी । केलो देशधडी मायाजाळे । गोत वित्त माय बाप बहिणी सुत ।
बंधुवर्ग माझी बाळे । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळे ।
जाणोनिया त्याग सर्वस्वे केला । सांभाळी आपुले जाळे ॥२॥
एका जवळी धरी आणिका अंतरी । ती काय सोयरी नव्हती माझी । एकाचे पाळण एकासी भांडण ।
चाड कवणिये काजी । अधिक असे उणे कवण कवण्या गुणे । हे माव न कळेचि तुझी ।
म्हणोनि चिंतनी राहिलो श्रीपती । तुका म्हणे भाक माझी ॥३॥
अर्थ
देवा सर्व विषयाबद्दलची माझी आवड आता नाहीशी करून मला तू तुझीच आवड लाव. देवा माझ्या मनातून तू आशा, मनस, तृष्णा, संकल्पना या सर्व काढून देशो धडीला लाव. देवा मी ‘मी तू’ पणाच्या व्यर्थ जाळ्यांमध्ये गुंतलो आहे आता तो भ्रम तु तोडून टाक देवा. अरे देवा माझे मन व बुद्धी तुझ्या चरणी स्थीर होऊ दे तूच माझ्या देहामध्ये वास्तव्य करीत आहे असाच अनुभव मला येऊ द्यावा. माझे खरे स्वरूप काय आहे ते या भवसागरातील मृगजळाने माझ्यापासून लपवून ठेवले आहे आणि मी व्यर्थ वर्ण जाती कुळ याचा अभिमान धरून राहिलो आहे. लहान मुले भातूकलीचा खेळ खेळतात परंतु हा त्यांचा खेळ खरा आहे काय? वेगवेगळ्या भावनेने माझ्या चित्ताची ताडातोड केली असून मायाजाळणे मला देशो धडीला लावले आहे. त्या भावना म्हणजे गोत , वित्त , माय , बाप , बहीण , मुलगा , बंधुवर्ग माझे बाळे. एकदा कि काळ जवळ आला की मग हे एकमेकांशी संबंध ठेवत नाहीत. देवा आता हे सर्व जाणूनच मी सर्वस्वाचा त्याग केला आहे त्यामुळे तुमचे मायाजाळ तुम्ही आवरून टाकावे. तुकाराम महाराज म्हणतात मी एकाला जवळ करतो तर दुसऱ्याला अंतर देतो मग दूर केलेले माणसे माझे सोयरे सज्जन नाहीत काय ? तसेच मी एकाचे पालन करतो दुसर्याशी भांडण करतो तर हे कशासाठी ? देवा मी एका बरोबर असे व दुसऱ्या बरोबर वेगळे असे कोणत्या कारणामुळे वागतो कोणत्या गुणामुळे असे मी दुसऱ्या बरोबर वागतो ही तुझी माया काही मला कळत नाही. त्यामुळेच हे देवा हे श्रीपती मी तुझेच चिंतन करून तुझ्या पायी स्थिर झालो आहे त्यामुळे तू माझी एवढी विनंती पूर्ण कर.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA