नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १७६९
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥१॥
विष ते अमृत अघाते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥धृपद॥
दुःख ते देईल सर्व सुख फळ । होतील शीतळ अग्नीज्वाळा ॥२॥
आवडेल जीवा जीवाचे परी । सकळा अंतरी एक भाव ॥३॥
तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणियेते येणे अनुभवे ॥४॥
अर्थ
ज्याचे चित्त शुद्ध आहे त्याचे शत्रू देखील मित्र होतात व त्याला वाघही खात नाही व साप काही करत नाही. त्याला विष जरी दिले तरी त्याचे अमृत होईल त्याच्यावर आघात जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे त्याचे हित होईल त्याच्या हातून अकर्तव्य जरी घडले तरी धर्मनीती प्रमाणे कर्तव्य घडल्यासारखे होईल. दुःख देखील त्याच्या साठी सुखाचे फळ घेऊन येईल त्याच्यासाठी अग्निज्वाला देखील शीतळ होतील. अशा मनुष्या विषयी सर्वांना “हा आपल्या प्राणापेक्षाही आपल्याला प्रिय आहे” असे वाटेल आणि सगळ्यांच्या अंतरंगात त्याच्याविषयी एक विध भक्तिभाव निर्माण होईल. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचा अनुभव ज्या माणसाला येईल त्याने हे जाणून घ्यावे “नारायणाने आपल्यावर कृपा केलेली आहे” व निश्चिंत व्हावे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA