नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १७४४
यज्ञनिमित्त ते शरिरासी बंधन । का रे तृष्णा वायाविण वाढविली ॥१॥
नव्हे ते भक्ती परलोकसाधन । विषयांनी बंधन केले तुज ॥धृपद॥
आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रती मुक्ती कैंचि ॥२॥
तुका म्हणे सिणसी वाया । शरण न वजता पंढरिराया ॥३॥
अर्थ
अरे यज्ञादी कर्मे करुन पुन्हा शरीरच प्राप्त होते मग तू विनाकारणच भोग तृष्णा का बरे वाढवतोस ? अरे हे साधन म्हणजे हे यज्ञयादी कर्मे म्हणजे परलोकीचे साधन नाही त्यामुळे तुला हरीभक्ती करता येत नाही खरे तर ते कर्म तुला विषयात बांधून टाकतात. फळाची अपेक्षा धरुन तू जर तीर्थ व्रत केले तर तुला मुक्ती कशी प्राप्त होईल ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे तू फक्त पंढरीरायाला शरण जा इतर व्यर्थ कर्म करुन का श्रम करुन घेतोस ? ”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA